AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीच्या डॉक्टर-स्टाफ मारहाण प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, रमेश म्हात्रे यांना…

कल्याणमधील नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. शास्नीनगर डाँक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात हा जामीन देण्यात आला आहे.

डोंबिवलीच्या डॉक्टर-स्टाफ मारहाण प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, रमेश म्हात्रे यांना...
ramesh mhatreImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 8:52 PM
Share

Ramsh Mhatre : डोंबिवलीमधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अजब प्रकार घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी नगरसेवकाने डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही नंतर समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई, अशी मागणी केली जात होती. वाढता दबाव लक्षात घेता रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता याच म्हात्रे यांना जामीन मंजूर झाला आहे. कल्याणच्या सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.

न्यायालयाने कोणत्या आधारावर जामीन दिला?

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. शास्नीनगर डाँक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात हा जामीन देण्यात आला आहे. रमेश म्हात्रे यांची वैद्यकीय स्थिती आणि इतर बाबींचा विचार करून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. म्हात्रे यांना जामीन देऊ नये अशी भूमिका सरकारी पक्षातर्फे घेण्यात आली होती. म्हात्रे यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.

तर दुसरीकडे बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. या मारहाण प्रकरणातील इतर तीन आरोपींचे जामीन अर्ज उद्या दाखल होणार आहेत. या आरोपींचाही जामीन अर्ज मान्य होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिला डॉक्टरच्या हातातील फोन….

समोर आलेल्या व्हिडीओत रमेश म्हात्रे हे आपल्या साथीदारांच्या मदतीने रुग्णालयात मारहाण करत असल्याचे तसेच वाद घालत असल्याचे दिसत आहे. याच वादादरम्यान, महिला डॉक्टरच्या हातातील फोनही हाताने खाली पाडल्याचे दिसत आहे. हे प्रकरण तापल्यानंतर मात्र रमेश म्हात्रे यांनी आम्ही कोणालाही मारहाण केली नाही. आमचा तसा उद्देश नव्हता. आमचे मत ऐकून घ्या, ही माझी मागणी होती, असे रमेश म्हात्रे म्हणाले होते. दरम्यान, आता  या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?