AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा तरच हे वठणीवर येतील…सुनील गावस्कर भडकले, असं का म्हणाले?

Sunil Gavaskar On Test No Ball: कसोटी क्रिकेटमध्ये हल्ली खूप नो बॉल टाकले जात आहे. आता यावरुनच माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर प्रचंड भडकले आहेत.

Sunil Gavaskar: खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा तरच हे वठणीवर येतील...सुनील गावस्कर भडकले, असं का म्हणाले?
| Updated on: Aug 30, 2026 | 4:26 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका नुकातीच पार पडली. ही मालिका भारतीय संघाने जिंकली. या सामन्यात एक गोष्ट घडली ज्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. श्रीलंके विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये नो-बॉलची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा आणि सारांश जैन यांनी मोठ्या संख्येने नो-बॉल टाकले. आता या वर भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक, साईराज बहुतुले यांनी गंमतीने असेही सुचवले की, नो-बॉलनंतर फ्री हिट दिल्यास गोलंदाजांना ओव्हरस्टेपिंगची चूक टाळण्यास मदत होऊ शकते. या दरम्यान आता माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक विधान केले.

या संदर्भात, गावस्कर यांनी मॅगझिनमधील त्यांच्या लेखात लिहिले, “भारतीय संघाच्या फिरकी प्रशिक्षकाने गंमतीने म्हटले की नो-बॉलनंतर फ्री हिट दिल्यास हा गुन्हा टाळता येऊ शकतो. पण कृपया, कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणे सोपे करू नका. खेळाचे हे स्वरूप आधीच फलंदाजांसाठी खूप अनुकूल आहे. फ्री हिटला पाठिंबा देण्याऐवजी, गावस्कर यांनी नो-बॉलची समस्या रोखण्यासाठी एक टोकाचा उपाय सुचवला. त्यांनी सुचवले की जे गोलंदाज नो-बॉल टाकतात, तसेच संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला आर्थिक दंड ठोठावला पाहिजे.”

गावस्कर यांनी त्यांच्या स्तंभात लिहिले, “या समस्येवर तोडगा काढण्याचा सर्वात व्यावहारिक मार्ग म्हणजे प्रत्येक नो-बॉलसाठी गोलंदाजाला दंड ठोठावणे. इतकेच नाही, तर प्रत्येक नो-बॉलसाठी गोलंदाजी प्रशिक्षकालाही दंड ठोठावला पाहिजे. यामुळे गोलंदाज क्रीजच्या मागून गोलंदाजी करायला शिकतील आणि गोलंदाजी प्रशिक्षकही नेट सत्रांमध्ये याकडे अधिक लक्ष देतील आणि वठणीवर येतील.”

२१.५.१. गोलंदाजाचा मागचा पाय गोलंदाजी शैलीनुसार रिटर्न क्रीजच्या आतच पडला पाहिजे आणि त्याने त्या क्रीजला स्पर्श करता कामा नये. अलीकडील मालिकेत रवी बिश्नोईच्या बाबतीत हे दिसून आले. त्याचा पाय वारंवार रिटर्न क्रीजला लागत होता. २१.५.२. गोलंदाजाचा पुढचा पाय अशा प्रकारे पडला पाहिजे की, पायाचा काही भाग, मग तो जमिनीवर असो किंवा हवेत उचललेला असो, तो कलम २१.५.१ मध्ये वर्णन केलेल्या रिटर्न क्रीजच्या बाजूला, दोन्ही मधल्या यष्टींना जोडणाऱ्या रेषेच्या त्याच बाजूला असावा. तसेच तो पॉपिंग क्रीजच्या मागे असला पाहिजे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?