मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध दर्शवत थेट इशारा दिल्यानंतर, खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी मेळाव्याला उपस्थित राहिल्यास पंचायत होईल, असा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध दर्शवत थेट इशारा दिल्यानंतर, खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी मेळाव्याला उपस्थित राहिल्यास पंचायत होईल, असा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परभणीमध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून या शेतकरी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होती. या प्रकरणी आता शिंदे गटातील नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नरेश मस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, राज्य सरकारने मराठा समाजाला आश्वासने दिली होती आणि या आश्वासनानुसार त्यांना दाखले मिळणे अपेक्षित होते, असे नमूद केले. काही दाखले रद्द झाल्याचे निदर्शनास आल्याने जरांगे पाटलांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याचे ते म्हणाले. संबंधित मंत्र्यांनी मराठा समाजाचे मुद्दे स्पष्ट करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाज आंदोलनात असताना असे उत्सव साजरे करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी मेळावा रद्द करण्याची मनोज जरांगे पाटलांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले.
Published on: Aug 30, 2026 12:49 PM
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...

