हाच ‘तो’ क्षण; राज ठाकरे – उद्धव ठाकरेंचं ‘मातोश्री’वर पुन्हा मनोमिलन

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी गुलाबांचा मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलंय. कौटुंबिक मनोमिलनानंतर राजकीय मनोमिलन होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

| Updated on: Jul 27, 2025 | 12:35 PM
1 / 5
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईसुद्धा होते.

2 / 5
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसाठी लाल गुलाबांचा मोठा पुष्पगुच्छ आणला होता. हा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मनोमिलन झाल्याचं पहायला मिळत आहे.

3 / 5
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

4 / 5
जानेवारी 2019 नंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत. 2019 मध्ये अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त तिथे पोहोचले आहेत.

5 / 5
वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं पहायला मिळत आहे. आजचा दिवस मराठी मासणाच्या दृष्टीने आनंदाचा, उत्साहाचा आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिली.