अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आईला अखेरचा निरोप; अंत्यदर्शनासाठी राज ठाकरेंची उपस्थिती

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजस्विनीने स्वतः आईला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्काराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

| Updated on: Aug 17, 2025 | 4:45 PM
1 / 6
आईच्या जाण्याने तेजस्विनी पंडितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेजस्विनीच्या आई ज्योती चांदेकर देखील एक मोठ्या अभिनेत्री होत्या.

2 / 6
अल्पशा आजाराने त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

3 / 6
पुण्यात त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अंत्यविधी केला. यावेळी तिनेच आईला मुखाग्नी दिला.

4 / 6
आईला निरोप देताना तेजस्विनी पंडितच्या तोंडून फक्त 'आई' एवढाच शब्द आला आणि तिला अश्रू अनावर झाले.

5 / 6
ज्योती चांदेकर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.

6 / 6
अंत्यसंस्काराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही उपस्थित होते.