
मुंबईत आज 'सत्याचा मोर्चा' काढण्यात येणार असून यासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरूवात होईल. मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमत आहेत.

विरोधी पक्षाकडून हा मोर्चा काढला जातोय. मनसे, उबाठा गट, शरद पवारांचा गट आणि कॉंग्रेस या मोर्चात सहभागी होत आहे. लोकलमध्येही मोठी गर्दी बघायला मिळतंय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले असून त्यांनी लोकलने प्रवास केला. काही कार्यकर्त्यांसह ते दादरहून चर्चगेटला पोहोचले आहेत.

दादर ते चर्चगेट असा प्रवास राज ठाकरेंनी केलाय. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे लोकलने प्रवास करताना दिसले. रस्त्यामधून वाहतूककोडीं टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

राज ठाकरेंनी अगोदरच जाहिर केले होते की, ते लोकलने प्रवास करणार आहेत. आता ते लोकल प्रवास करून हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

विरोधी पक्षाच्या या मोर्चाला सुरूवात दुपारी 1 वाजता होईल. निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय. मोठया संख्येने लोक जमताना दिसत आहेत.

सर्वत्र बॅनर आणि पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलीये. मुंबईमध्ये ठिकठिकाणी सर्वपक्षीय झेंडे हे बघायला मिळत आहेत.

शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेससह सर्व डावे पक्ष यात सहभागी होत आहेत. खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा! असे नारे दिले जात आहेत.

बोगस मतदार यादी, मतदान यादीतील फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरुद्ध विरोधकांनी एकत्र येत 'सत्याचा मोर्चा' काढण्याचा निर्णय घेतला आहे.