पावसातील प्रचंड रोमँटिक गाणं, जे 52 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही पाऊस पडताच…

राजेश खन्ना यांचं 52 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, ज्यामध्ये विजांचा आवाज काढण्यासाठी RD बर्मन यांनी घडवलेली अनोखी शक्कल. आजही पावसात प्रत्येकजण तेच गाणं ऐकतो.

| Updated on: Jul 09, 2026 | 2:57 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी त्यांच्या सुरेल चाली आणि अर्थपूर्ण शब्दांमुळे अजरामर ठरली आहेत. मात्र, काही गाणी त्यामागील रंजक किस्स्यांमुळेही कायम चर्चेत राहतात.

2 / 5
1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ चित्रपटातील ‘भीगी भीगी रातों में’ हे असेच एक सदाबहार रोमँटिक गाणे असून, तब्बल 52 वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.

3 / 5
हे गाणे राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. पावसाच्या सरी, रोमँटिक वातावरण आणि दोघांची अप्रतिम ऑनस्क्रीन केमिस्ट्री यामुळे हे गाणे त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या पावसातील गाण्यांपैकी एक ठरले.

4 / 5
या गाण्याशी संबंधित एक खास किस्सा आजही चर्चिला जातो. त्या काळात आधुनिक डिजिटल साउंड इफेक्ट्स किंवा अत्याधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाण्यात विजेच्या कडकडाटाचा नैसर्गिक आवाज निर्माण करण्यासाठी आर. डी. बर्मन यांनी अनोखी शक्कल लढवली.

5 / 5
त्यांनी घरांच्या छतावर वापरल्या जाणाऱ्या एस्बेस्टसच्या पत्र्यांना एकमेकांवर आपटून विजेच्या गडगडाटासारखा आवाज तयार केला. हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, आजही गाण्यातील तो ध्वनी अगदी नैसर्गिक वाटतो. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे.

Follow Us