
बाॅलिवूड अभिनेते राजीव कपूर यांना खरी ओळख ही राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांनी धमाकेदार असा अभिनय केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

राजीव कपूर यांनी 2001 मध्ये आरती सभरवाल सोबत लग्न केले. मात्र, यांचे लग्न फार काळ काही टिकू शकले नाही. लग्नाच्या दोनच वर्षांनी यांच्यामध्ये घटस्फोट झाला.

काही वर्षांपूर्वीच राजीव कपूर यांचे निधन झाले. मात्र, आरती नेमकी कुठे आहे आणि कशी जीवन जगत आहे हे कोणीच बघितले नाही. राजीव कपूर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आरती ही कॅनडाला गेली.

तिथे तिने बरीच वर्षे काम केले. त्यानंतर 2004 मध्ये दिल्लीमध्ये येत आरतीने फॅशनच्या बिझनेसला सुरूवात केली. मात्र, त्यानंतर आरतीने लोणच्याचा बिझनेस सुरू केला.

चक्क कपूर खानदानाच्या सुनेवर लोणचे विकण्याची वेळ आलीये. कपूर कुटुंबियांपैकी कोणीच आता आरती हिच्या संपर्कात नसल्याचे देखील सांगितले जात आहे.