Raksha Bandhan 2025 : देवी-देवतांचे चित्र असलेली राखी खरेदी करावी की नाही? शास्त्रात काय म्हटलंय?

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण आहे. यावेळी योग्य राखी निवडणे महत्त्वाचे आहे. तुटलेल्या, जुन्या किंवा देवतांच्या प्रतिमा असलेल्या राख्या टाळाव्यात कारण त्या अशुभ मानल्या जातात. काळ्या रंगाच्या किंवा प्लास्टिकच्या राख्याऐवजी पर्यावरणपूरक आणि पारंपारिक राख्या निवडा. यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत राहील.

| Updated on: Aug 06, 2025 | 4:15 PM
1 / 10
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगेबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे.

2 / 10
सर्वच बहिणी आपल्या लाडक्या भावांसाठी सुंदर आणि खास राख्या शोधताना दिसत आहेत. बाजारात विविध प्रकारच्या, आकर्षक राख्या उपलब्ध असल्या तरी, राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

3 / 10
कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हा भावा-बहिणींच्या पवित्र नात्यात दुरावा निर्माण करू शकते. जर तुम्ही तुमच्या भावासाठी राखी खरेदी करणार असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे.

4 / 10
राखी खरेदी करताना तुटलेल्या किंवा जुन्या राख्या खरेदी करणे टाळा. राखीवरील चित्र किंवा सजावट तुटलेली असल्यास, ती राखी भावाला बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या भावाच्या मनगटावर अशी राखी बांधू नका.

5 / 10
या राखी करताना नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अनेक बहिणी आपल्या भावासाठी गणपती, श्रीकृष्ण किंवा इतर देवतांच्या प्रतिमा असलेल्या राख्या खरेदी करतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार अशा राख्या भावांना बांधू नयेत.

6 / 10
कारण या राख्यांना हातावर बांधणे आणि नंतर त्या काढून टाकणे यामुळे देवांचा अपमान होतो. यामुळे भावावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे, या पवित्र दिवशी अशा राख्यांचा वापर करणे टाळावे.

7 / 10
हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाला नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी भावाच्या मनगटावर काळ्या रंगाचा धागा असलेली राखी बांधू नका. अशा राख्यांमुळे तुमच्या आणि भावाच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

8 / 10
तसेच, प्लास्टिकच्या किंवा सिंथेटिक राख्या दिसायला कितीही आकर्षक असल्या तरी त्या टाळा. प्लास्टिक पर्यावरणासाठी तर धोकादायक असते. त्याशिवाय त्याचा सकारात्मक परिणाम होत नाही.

9 / 10
त्याऐवजी तुम्ही पर्यावरणपूरक आणि पारंपरिक धाग्यांच्या राख्या खरेदी करू शकता. यामुळे तुमचे नातं अधिक घट्ट होण्यास नक्कीच मदत होईल.

10 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)