ओल्या साडीमधील सीनमुळे रातोरात बनली स्टार, पण एका चुकीने उद्ध्वस्त झालं करिअर, सोडली इंडस्ट्री

वयाच्या 21 व्या वर्षी एका रात्रीत प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री. बोल्ड सीन आणि सिंपल लुकने तिने प्रेक्षकांना वेड लावलं. पण एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं करिअर.

| Updated on: May 28, 2026 | 12:55 PM
1 / 5
1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, निरागस अभिनयाने आणि निळ्या डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. अवघ्या 21 व्या वर्षी तिने असा स्टारडम मिळवला की ती रातोरात देशभर चर्चेत आली.

2 / 5
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. चित्रपटातील मंदाकिनीचा निरागस चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला.

3 / 5
विशेषतः पांढऱ्या साडीत धबधब्याखाली चित्रित करण्यात आलेला तिचा सीन त्या काळात खूप चर्चेत आला होता. त्या काळातील सर्वात बोल्ड दृश्यांपैकी एक म्हणून या सीनकडे पाहिले गेले. या एका दृश्यामुळे मंदाकिनी देशभरात लोकप्रिय झाली.

4 / 5
मात्र, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले. दोघांचे काही फोटो समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मंदाकिनीने दाऊद इब्राहिमसोबत कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही अफवा आणि चर्चांमुळे तिच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.

5 / 5
या वादानंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. परिणामी, तिला चित्रपट मिळणे कमी झाले आणि हळूहळू ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us