राणी मुखर्जी की काजोल; दोघी बहिणींमध्ये कोण सर्वांत जास्त श्रीमंत?

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल या बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. राणी मुखर्जीला नुकताच 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या दोघींचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 2:53 PM
1 / 5
राणी मुखर्जी आणि काजोलने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघी चुलत बहिणी आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये किंवा दुर्गापूजाला त्यांना नेहमी एकत्र पाहिलं जातं. या दोघींपैकी सर्वांत जास्त श्रीमंत कोण आहे, ते पाहुयात..

2 / 5
जीक्यूने दिलेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय पती आदित्य चोप्रासोबत ती अनेक संपत्तीची मालकीण आहे. मुंबईत तिचं एक मॅन्शन असून त्याची किंमत जवळपास 30 कोटी रुपये इतकी आहे.

3 / 5
राणी मुखर्जीच्या नावे 7.12 कोटी रुपयांचा एक अपार्टमेंट आणि नवी मुंबईत 8 कोटी  रुपयांचा बंगला आहे. याशिवाय आणखी एक बंगला तिच्या नावावर असून, त्याची किंमत 8 कोटी रुपयांच्या घरात आहे. राणी एका चित्रपटासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये मानधन घेते. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्यासुद्धा आहेत.

4 / 5
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, काजोलची संपत्ती राणीपेक्षा थोडी जास्त आहे. काजोल 249 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. अभिनयाशिवाय ती ब्रँड प्रमोशनमधूनही चांगली कमाई करते.

5 / 5
काजोल आणि तिचा पती अजय देवगणच्या नावावर जुहूमध्ये 'शक्ती' नावाने बंगला आहे. या बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय जुहूमध्येच त्यांची आणखी दोन घरं आहेत. लंडनमध्येही काजोलचं घर आहे. तिच्याकडे BMWX7 आणि ऑडी Q7 सारख्या आलिशान गाड्या आहेत.