Badshah divorce: लग्न आहे की खेळ! 5 महिन्यात बादशाहचा घटस्फोट, पोस्ट करत दिली माहिती
Badshah divorce: प्रसिद्ध रॅपर बादशाहने पाच महिन्यांपूर्वी लग्न केले होते. आता त्याने घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे. बादशाहने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे.

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांनी पाच महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. बादशाहने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. आता, सोमवारी रात्री दोघांनी एकत्रित सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण केवळ पाच महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.

बादशाह आणि ईशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर घटस्फोट घेतल्याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “मी आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या स्वतंत्र मार्गांवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे" असे म्हटले आहे.

पुढे त्यांनी, "हा निर्णय परस्पर आदराने घेतला गेला आहे आणि या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी सर्वांना विनंती आहे” असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर बादशाह आणि ईशा यांच्या घटस्फोटाची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने अरे लग्न आहे की खेळ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने आता तर लग्न झाले होते असे म्हटले आहे.

मार्च 2026मध्ये बादशाहने ईशा रिखीशी लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.