Aishwarya Rai : 32 वर्षांनंतर ऐश्वर्या रायच्या मिस वर्ल्ड विजयाचे दुर्मिळ फोटो व्हायरल, पाहून व्हाल थक्क

Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. आता ऐश्वर्या रायच्या मिस वर्ल्ड विजयाचे दुर्मिळ फोटो व्हायरल व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 3:29 PM
1 / 6
1994 मध्ये आजच्याच 19 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा मुकुट आपल्या नावावर केला होता. आपल्या सौंदर्याने, बुद्धिमत्तेन  आणि शानदार शैलीने तिने संपूर्ण जगाचं मन जिंकून घेतलं होते. आज तिला मिस वर्ल्ड होऊन 32 वर्षे पूर्ण झाली आहेत.

1994 मध्ये आजच्याच 19 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा मुकुट आपल्या नावावर केला होता. आपल्या सौंदर्याने, बुद्धिमत्तेन आणि शानदार शैलीने तिने संपूर्ण जगाचं मन जिंकून घेतलं होते. आज तिला मिस वर्ल्ड होऊन 32 वर्षे पूर्ण झाली आहेत.

2 / 6

या खास निमित्ताने मिस इंडिया ऑर्गनायझेशनने ऐश्वर्या रायचे जुने आणि न पाहिलेले फोटो शेअर केलेले. तसेच एक मोठं कॅप्शनही लिहिलं, आणि ऐश्वर्याला 'Crowniversary' च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 6

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही ऐश्वर्याचा हा प्रवास स्वप्नांची, मेहनतीची आणि दृढ निश्चयाच्या ताकदीची एक मिसाल बनून राहिला आहे. फेमिना मिस इंडियाच्या मंचावरून सुरू झालेला तिचा प्रवास आजही लोकांना प्रेरित करतो.

4 / 6

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. तिने डोक्यावर मुकुट घातला असून चेहऱ्यावरचा निरागसपणा स्पष्टपणे झळकत आहे.

5 / 6

ऐश्वर्या रायने अवघ्या 21 व्या वर्षी हा किताब आपल्या नावावर केला होता. त्या वेळी तिच्या सौंदर्याने आणि तल्लख बुद्धिमत्तेने भारताला ही कामगिरी मिळवून दिली होती, जी आजही स्मरणात आहे.

6 / 6

ऐश्वर्या रायपूर्वी रीता फारिया यांनी 1966 मध्ये हा किताब जिंकला होता. त्या मिस वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या आशियाई महिला होत्या. त्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या राय भारताची दुसरी मिस वर्ल्ड बनली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us