

सूर्य-शनीची युती कर्क राशीसाठी अडचणीची ठरु शकते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी जीभेवर ताबा ठेवावा. लोकांसोबत विनम्रतेने बोला, नाहीतर झालेली काम बिघडतील. नात्यात कटुता येऊ शकते. तसेच बेफेकीर होऊन गाडी चालवू नका.

सिंह राशीसाठी ही वेळ वैवाहीक आयुष्यात तणाव वाढवू शकते. त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन काही करण्यापासून सावध रहा. भागीदारीत काम करत असाल तर समजुतीने घ्या, मात्र प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा

सूर्य-शनी युतीमुळे वृश्चिक राशासाठी आर्थिक दृष्ट्या नुकसानकारक ठरु शकते. व्यवसायात गूंतवणुक करण्याआधी थोडी प्रतिक्षा करा. तसेच शारिरीक-मानसिक समस्येचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ राशीसाठी सूर्य-शनी युती ही फायदेशीर आणि नुकसानकारक ठरु शकते, कारण सूर्य-शनीचं मिलन हे कुंभ राशीत होणार आहे. त्यामुळे घाई-गडबड टाळा, विचारपूर्वक निर्णय घ्या.