AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशमध्ये सत्ता येताच तारिक रहमान यांचा मोठा धमाका, भारतासाठी गुड न्यूज, घेतला अत्यंत मोठा निर्णय

बांगलादेशमध्ये बीएनपीची सत्ता आली आहे, तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे, भारतासाठी गुडन्यूज आहे.

बांगलादेशमध्ये सत्ता येताच तारिक रहमान यांचा मोठा धमाका, भारतासाठी गुड न्यूज, घेतला अत्यंत मोठा निर्णय
Tariq RehmanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 6:15 PM
Share

बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत बीएनपी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीने सत्ता स्थापन केली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान तारिक रहमान यांच्यापूर्वी बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार होतं, शेख हसीना या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार सत्तेत आलं. मोहम्मद यूनुस यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. त्यामुळे बांगलादेशमध्ये नवीन सरकार आल्यानंतर नव्या सरकारचं भारताबाबत धोरण नेमकं कसं असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

बांगलादेशमधील तारिक रहमान यांच्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारतासोबतचे धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी बांग्लादेश सरकारने मोठा निर्णय घेलता आहे. दिल्लीमधील बांगलादेशच्या हाय कमिशनने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांसाठी बांगलादेशची व्हिसा सेवा पूर्ववत केली आहे. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये असलेल्या मोहम्मद यूनुस सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली होती, ही बंदी उठवण्याचा निर्णय आता बांगलादेशच्या नव्या सरकारने घेतला आहे. यामुळे बांगलादेश आणि भारतामधील धोरणात्मक संबंधांना चालना मिळणार आहे.

दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर नव्या सरकारची काय भूमिका असणार? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होता. मात्र या मुद्दावर देखील बांगलादेश सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेख हसीना या सध्या भारताच्या आश्रयाला आहे, त्यांच्या प्रत्यार्पणावर चर्चा होईल, मात्र जरी भारताने शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवलं नाही तरी देखील त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असं नव्या सरकारने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतानं देखील आता बांगलादेशातील नागरिकांसाठीची व्हिसा सेवा पूर्ववत करण्यासाठी पाऊल उचललं आहे. मेडिकल व्हिसा देण्यात येत आहे, ट्रॅव्हल व्हिसाबाबत देखील आता लवकरच निर्णय होणार आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान