
सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे. या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करून भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. पण ज्योतिषशास्त्रात या सोमवारसाठी काही विशेष नियम तयार केले आहे. या दिवशी काही गोष्टी खरेदी करण्यास मनाई आहे. चला जाणून घेऊयात सोमवारी काय खरेदी करू नये ते...

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी धान्य खरेदी करू नये. सोमवारी धान्य खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी रंग-ब्रश-वाद्य यंत्र अशा कलात्मक क्षेत्राशी निगडीत गोष्टी विकत घेऊ नये. तसेच अभ्यासाशी निगडीत पुस्तकं, पेन, पेन्सिल खरेदी करू नये.

सोमवारी खेळाशी निगडीत वस्तू घेणंही टाळलं पाहीजे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या दिवशी या वस्तू खरेदी केल्या तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी इलेक्ट्रीक गोष्टी खरेदी करणं अशुभ मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी केल्याने महादेव नाराज होतात.

सोमवारी झाडू खरेदी करू नये, अशीही ज्योतिषीय मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार, सोमवारी झाडू खरेदी केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सोमवारी लोखंडाशी निगडीत वस्तू खरेदी करू नये. कारण सोमवार हा चंद्राशी निगडीत वार आहे. लोखंड हे शनिशी संबंध ठेवते. चंद्र आणि शनि यांच्यामुळे विष योग तयार होतो. त्यामुळे सोमवारी लोखंड खरेदी करू नये. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क/हिंदी)