
सध्या शुक्र ग्रह तुळ राशीमध्ये गोचर करत आहे. त्यानंतर आगामी काही दिवसांत बुध ग्रहदेखील लवकरच तुळा राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र ग्रहांची युती होणार आहे.

याच अनोख्या युतीमुळे तीन राशींचे नशीब फळफळणार असल्याचे बोलले जात आहे. या राशींवर पैशांचा पाऊस पडू शकतो, मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, असे ज्योतिषशास्त्रानुसार म्हटले जात आहे.

बुध आणि शुक्र ग्रहांच्या युतीची कर्क राशीवर कृपादृष्टी पडणार आहे. आगामी काळात तुम्हाला सकारात्मक वाटू शकतो. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. मात्र या काळात आरोग्यावर लक्ष देण्याची घरज आहे. तुम्हला एखादी चांगली खबर मिळण्याचीही शक्यता आहे.

तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही मोठे बदल होताना दिसतील. शुक्र आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे तुळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाराच्या विस्तारासाठी चांगले गुंतवणूकदार मिळू शकात. तसेच करिअरच्या प्रवासात नवे टास्क मिळू शकतात.

बुध आणि शुक्र यांच्यातील युतीचा मकर राशीलाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीत नवे प्रोजेक्ट्स मिळू शककतात. तसेच धनलाभाचाही योग आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. परंतु तुम्हाला आर्थिक बाबतीत निर्णय घेताना विचार करणे गरजेचे आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.