
ज्योतिषशास्त्रानुसार केतूला मायावी आणि छाया ग्रह म्हटले जाते. केतूच्या चालीचा प्रभाव सर्वच 12 राशींवर पडतो. या वर्षी केतूने नक्षत्र परिवर्तन केलं आहे. सध्या केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात विराजमान आहे.

शुक्र ग्रहला पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी म्हटले जाते.शुक्राच्या नक्षत्रात केतूने प्रवेश केल्यामुळे काही राशींना फार चांगला फायदा होणार आहे.

केतूने शुक्र नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे मेष राशीला फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे मेष राशीचे लोक दिलेला टास्क पूर्ण आत्मविश्वासासाने पूर्ण करतील. तसेच व्यापाऱ्याना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शरीरातील पाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुळ राशीलाही केतूने शुक्र ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश केल्याचा फायदा होणार आहे. यामुळे तुळ राशीच्या लोकांना कायदेशीर लढ्यात फायदा मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रीत राहील. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे.

केतूने शुक्र ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश केल्याचा फायदा मिथून राशीलाही होणार आहे. या काळात सकारात्मक ऊर्जा कायम राहील. नोकरीत प्रमोशनचा योग येऊ शकतो. जीवनात असलेला तणाव कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना एखादी खुशखबर मिळू शकते. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)