
सध्या श्रावण महिना चालू आहे. हिंदू धर्मानुसार हा महिना फार पवित्र असतो. याच महिन्यात श्रावण पौर्णिमा असते. यावेळी येत्या 9 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा असेल . या दिवशी काही राशींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या दिवशी काही विशिष्ट राशीच्या लोकांना अनेक संकटांना तोंड द्यायला लागू शकतं. या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या....

येत्या 9 ऑगस्ट रोजी चंद्रदेव शनीदेवाच्या राशीमध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे चंद्रदेवाने चाल बदलल्यामुळे त्याचा काही राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर उशिरा रात्री चंद्रदेव कुंभ राशीत गोचर करेल. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींवर शनी ग्रहाचे स्वामित्व आहे.

चंद्रदेव आणि शनी यांच्यात शत्रूत्त्व भाव आहे. त्यामुळेच शनीच्या राशीत जेव्हा चंद्रदेव असेल तर तीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. मिथून, कर्क, मीन राशींचा यात समावेश आहे...

श्रावण पौर्णिमेला मिथून राशीच्या लोकांनी मोठे निर्णय घेणे टाळावेत. जीवनात अचानकपणे मोठा बदल होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. धन, संपत्तीविषयीचे निर्णय उशिराने घ्यावेत.

कर्क राशीच्या लोकांनीही या काळात थोडे जपूनच वागावे. बोलताना शब्द जपून वापरावेत. आरोग्याविषयी जागरुक राहा. घरातील सदस्याची प्रकृती अचानकपणे बिघडू शकते. तिसऱ्या व्यक्तीमुळे वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण होऊ शकतात.

मीन राशीच्या लोकांनीही या काळात सतर्क राहावे. या काळात मीन राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुमचा मान-सन्मान कमी होऊ शकतो. कौटुंबिक वाद वाढू शकतात. एकाग्रता भंग होऊ शकते. या काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.