
ग्रहमंडळात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव हिशेब करतात आणि त्यांना फळ देतात. अशा स्थितीत शनिची साडेसाती म्हंटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण हा प्रभाव साडेसात वर्षे असतो.

शनिदेव सध्या मीन राशीत असून या राशीसह कुंभ आणि मेष राशीला साडेसाती सुरु आहे. कुंभ राशीसाठी शेवटची अडीच, तर मेष राशीसाठी पहिली अडीच वर्षे सुरु आहेत. मीन राशीचा साडेसातीचा पाच वर्षांचा काळ शिल्लक आहे.

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी जातकांनी शनिवारी शनि मंदिरात दर्शनासाठी जावं. तसेच सोबत मोहरीचं तेल न्या आणि ते अर्पण करा.

शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात काळे तीळ आणि उडद डाळ टाका. असं साडेसातीच्या काळात दर शनिवारी करा.

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो. शनिवारी सकाळी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं. तसेच संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावावा.

शनिवारी शनि चालिसा, हनुमान चालिसेचं पठण करावं. यामुळे शनिदेवांसोबत मारुतीरायाचाही आशीर्वाद मिळतो. तसेच ॐ शनैश्चराय नमः" या मंत्राचा जप करावा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)