
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस तणावपूर्ण राहील. त्यामुळे काळजी घ्या. उगाच वाद होईल असं वागू नका. मित्रांसोबत आपल्या समस्या शेअर करा आणि त्यातून मार्ग काढा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा काय आहे याकडे लक्ष केंद्रीत करा. त्यामुळे पुढची वाट आणखी सोपी होणार आहे. आत्मपरीक्षण करा आणि भविष्याचा वेध घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

आज महत्वाची खरेदी विक्री करण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहार मोठा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जागा खरेदी करताना त्याचं कायदेशीर प्रकरण आहे की नाही ते तपासा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

मित्रांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. व्यवसाय एकत्र करत असाल तर काळजी घ्या. नाहीतर आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

प्रत्येक गोष्ट आपण ठरवली तशी नाही झाली की चिडचिड होते. कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कामं करत राहा. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

आज दिवसभरात तुम्ही आखलेली कामं पूर्ण होतील. त्यामुळे दिवस सार्थकी लागल्याचा आनंद होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर जेवणाचा बेत आखू शकता. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

प्रेमप्रकरणात आजचा दिवस अडचणीचा जाईल. काही घटना मनाविरुद्ध घडतील. जोडीदारांना ऐनवेळी दगाफटका दिल्याने अस्वस्थ व्हाल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

वडिलधाऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पावलं उचला. घाई करण्यात काही अर्थ नाही. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

घराची डागडुजी करू शकता. पण त्यासाठी आर्थिक नियोजन योग्य आहे का बघा. कारण एक काम हाती घेतलं की लगेच दुसऱ्या कामासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)