

शनीच्या वक्री स्थितीचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. शनीच्या वक्री चालीचा काही राशींना फायदा होणार आहे. मात्र 3 राशींसाठी शनीची ही वक्री चाल फार तापदायक ठरणार आहे. त्या 3 राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीची उलटी चाल अधिक डोकेदुखी ठरणार आहे. मेष राशी असणाऱ्या व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतील. ताण वाढेल. (Photo Credit : Tv9)

मिथुन राशीसाठी शनी गोचर शुभ आहे मात्र वक्री चाल ही कष्टप्रद ठरणारी आहे. नोकरदार वर्गाला करियरबाबत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांना नुकसान होऊ शकतो. कुटुंबातील वडीलधाऱ्यांची तब्येत बिघडू शकते. (Photo Credit : Tv9)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल तोट्याची ठरु शकते. नव्याने उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा. करियरमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. (Photo Credit : Tv9) (Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.)