
पांढऱ्या घुबडाबाबत अनेक मिथकं चर्चिले जातात. काही जणांच्या मते शुभ, तर काही जणांना या घटना अशुभ वाटतात. हिंदू धर्मात घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. पण रात्रीच्या वेळी पांढरं घुबड पाहणं शुभ की अशुभ असा प्रश्न पडतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळेस पांढरं घुबड पाहणं शुभ मानलं जातं. त्याचे स्वरूप सुख, समृद्धी आणि संपत्तीचे लक्षण असू शकते. पांढरे घुबड शुभ संकेत आहेत. घुबडाला पाहताच एक गूढ रहस्य असल्याचे वाटते.

घुबड हे ज्ञान आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. विशेष म्हणजे घुबड रात्रीही स्पष्ट पाहू शकते. त्याचं मौन, एकाग्रता तीव्र असते. कोणताही गोंधळ न करता तो आपली दिशा ठरवतो. या सर्व गुणांमुळे देवी लक्ष्मीला घुबड प्रिय आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री पांढरे घुबड दिसणे हे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भविष्यात काही तरी चांगलं घडणार असं मनात ठरवून घ्या.

ज्योतिषशास्त्रानुसार, पांढरे घुबड दिसणे म्हणजे तुमच्यावर येणारे मोठे संकट टळले आहे. संकटाच्या वेळी देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत, असे संकेत मिळतात. घुबड हा केवळ पक्षी नसून ते एक आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे.

धर्मशास्त्रानुसार, तुमच्यावर असलेलं आर्थिक संकट दूर होणारआहे. तसेच अडचणीच्या काळात तुम्हाला कुठूनतरी मदत मिळू शकते. घुबड धैर्यवान, अंतर्मुख आणि तंत्रविद्येचे प्रतीक मानला जाते. घुबड अंधारातही प्रकाश शोधण्याची शक्ती असल्याचे प्रतीक आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)