
शनिदेव सध्या मीन राशीत विराजमान असून अडीच वर्षे या राशीत राहणार आहे. त्यात शुक्राच्या स्थितीत 13 एप्रिलपासून बदल होणार आहे. वक्री अवस्थेत असलेला शुक्र मार्गस्थ होत असल्याने काही राशींना लाभ मिळणार आहे. शुक्र आणि शनिची युती काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. त्या 4 राशी कोणत्या? जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

शुक्र मार्गस्थ होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. वृषभ रास असणाऱ्यांना धन लाभ होईल. आर्थिक समस्या दूर होतील. खूप यश मिळेल. सुख आणि समृद्धी वाढेल. तसेच आरोग्य सुधारेल. (Photo Credit : Tv9)

शुक्र मार्गस्थ होणार असल्याने कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कामाचे कौतुक केलं जाईल. व्यवसाय चांगला चालेल. गुंतवणुकीतून नफा होईल. (Photo Credit : Tv9)

मकर राशीच्या लोकांनाही शुक्र ग्रहामुळे फायदा होईल. मकर राशीची साडेसाती देखील संपली आहे. त्यामुळे मकर राशीला दुहेरी फायदा होईल. प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल. धनलाभ होईल. (Photo Credit : Tv9)

कुंभ राशीच्या लोकांनाही शुक्र ग्रहाचा फायदा होईल. संपत्तीत वाढ होईल. अन्य मार्गातून कमाई होईल. ताण निघून जाईल. काम चांगले होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. (Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.) (Photo Credit : Tv9)