AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आता सुट्टी नाही! विराट सर्वाधिक षटकार लगावण्यासाठी सज्ज, रनमशीनचा व्हीडिओ व्हायरल

Virat Kohli Rcb IPL 2026 : विराट कोहली याने आतापर्यंत 18 मोसम गाजवले आहेत. विराटने प्रत्येक मोसमात काही न काही करुन दाखवलंय. अशात आता विराटने आगामी 19 व्या मोसमासाठी जोरदार तयारी केली आहे.

IPL 2026: आता सुट्टी नाही! विराट सर्वाधिक षटकार लगावण्यासाठी सज्ज, रनमशीनचा व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Rcb IplImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2026 | 7:11 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या हंगामाचं काउंटडाउन सुरु झालं आहे. स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या रनसंग्रामासाठी एकूण 10 संघांनी सरावाला सुरुवात केलीय. या मोसमाआधी आरसीबाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा नवा अवतार पाहायला मिळाला. विराटने नेट सेशनमध्ये जोरदार बॅटिंग करत गोलंदाजांची धुलाई केली.

विराटने सराव सत्रात गोलंदांजाची जोरदार धुलाई करत मोठे फटके मारले. विराट कायमच फटकेबाजी करत आला आहे. मात्र आताचा विराटचा हा अवतार पाहता चाहत्यांना 19 व्या मोसमात काही तरी नवीनच पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विराटने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्यात आयपीएल वर्षातून 2 महिनेच असतं. तसेच विराट त्याच्या कारकीर्दीत शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे विराट या मोसमात पूर्ण ताकदीने उतरणार आहे हे स्पष्ट आहे. विराटने त्यानुसार सरावाला सुरुवात केलीय.

विराट गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दर्जेदार फटकेबाजी करतोय. त्यात आता विराट पावरफुल बॅटिंगही करतोय. त्यामुळे विराट ज्या पद्धतीने खेळतोय तोच फॉर्म कायम राहिला तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचं काही खरं नाही.

विराट आयपीएलमधील षटकारांचा विक्रम मोडीत काढणार?

विराटने 2016 साली एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावले होते. विराटने त्या मोसमात 38 षटकार खेचले होते. विराटची ती सर्वोत्तम कामगिरी होती.

विराटची कामगिरी

विराट कोहली याने गेल्या वर्षभरात 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 शतकं आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 616 धावा केल्या आहेत. आता विराटचा हाच तडाखा कायम राहतो की रनमशीन यापेक्षा सरस कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान आरसीबी गतविजेता आहे. आरसीबीने गेल्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. यंदा पहिल्या टप्प्यात आरसीबीचे 4 सामने होणार आहेत. या मोसमातील पहिल्याच सामन्यात आरसीबी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 28 मार्चला होणार आहे.

आरसीबीचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28 मार्च

दुसरा सामना, विरुद्ध सीएसके, 5 एप्रिल.

तिसरा सामना, विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 10 एप्रिल.

चौथा सामना, विरुद्ध मुंबई इंडियन्स, 12 एप्रिल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात