
3 ऑगस्ट 2025, रविवार हा दिवस खास असणार आहे. रविवारी शुक्ल शुभ योग तयार होत आहे. रविवारी नवमी तिथी असणार आहे. रविवार अनेक राशींसाठी लाभदायी ठरु शकतो. नक्षत्रांचा अधिपती असलेला चंद्र या दिवशी विशाखा नक्षत्रात असणार आहे. चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. (Photo Credit : Tv9)

वृषभ रास : वृषभ राशीसाठी रविवारचा दिवस चांगला राहिल. व्यावसायिकांना रविवारी नफा मिळेल. तुमचे ग्राहक समाधानी राहतील. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करु शकता. मन शांत राहील. सकारात्मक ऊर्जा कायम राहील. 'ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः' या मंत्राचा जप करा. (Photo Credit : Tv9)

कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. आई-वडिलांकडून लाभ होईल. प्रत्येक टप्प्यावर मित्र मदतीसाठी हजर असतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येईल. शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि पाण्याने अभिषेक करा. (Photo Credit : Tv9)

सिंह रास : सिंह राशीसाठी रविवार चांगला राहणार आहे. रविवारी तुमचा आदर-सन्मान वाढेल. तुमचं नेतृत्व कौशल्य वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. रविवारी सूर्याची प्रार्थना करा. (Photo Credit : Tv9)

वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रविवार हा शुभ दिवस असेल. रविवारी निर्णयक्षमता वाढू शकते. कोणत्याही जुन्या किंवा नवीन गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. (Photo Credit : Tv9)

धनु रास : धनु राशीसाठी रविवारचा दिवस शुभ राहील. रविवारी नवीन योजनांमध्ये यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. मन लावून काम करा. हळद आणि गूळ दान करा. (Photo Credit : Tv9)