
कारमध्ये गणपती किंवा हनुमानाची मूर्ती छोटी मूर्ती असावी, असं वास्तुतज्ज्ञांचं म्हणणं आहे. गणपती विघ्नेश्वर असून प्रवासादरम्यान येणारे अडथळे दूर करतात.तर मारुतीरायाचं जिथे वास्तव्य तिथे नकारात्मक उर्जा नसते.

कासव हे दीर्घायुष्याचं प्रतिक आहे. त्यामुळे वाहनचालक आणि कुटुंबाचं दीर्घायुष्यासाठी गाडीत कासव ठेवावा. कारमध्ये काळ्या कासवाची मूर्ती ठेवल्याने वाहनधारकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तू तज्ज्ञ सांगतात.

कारच्या डॅश बोर्डवर क्रिस्टल्स लावणे शुभ मानलं गेलं आहे. वाहन जमिनीशी संबंधित असल्याने क्रिस्टल्सचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.

कारमध्ये कायम पाण्याची बाटली ठेवावी. जल तत्व स्पष्टता आणि विचारांचं प्रतिनिधीत्व करते. पाणी इलेक्ट्रिक उपकरणांद्वारे पसरणारी नकारात्मक ऊर्जा दूर करते.

कारमध्ये तुटक्याफुटक्या वस्तू ठेवू नये. कारच्या खिडक्या, कार्पेट आणि सीट कायम स्वच्छ ठेवावीत. यामुळे गाडी चालवताना डोकं शांत राहतं आणि सकारात्मक उर्जेचा अनुभव होतो.