
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रश्मिका लवकरच अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न करणार आहे. लग्नाआधी ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे.

गर्ल्स गँगसोबत रश्मिका मंदानाच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. मैत्रिणींसोबत ती श्रीलंकेला फिरायला गेली आहे.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये रश्मिकाने लिहिलं, 'मला नुकतीच दोन दिवसांची सुट्टी मिळाली. या दोन दिवसांत मी माझ्या मैत्रिणींसोबत मनसोक्त फिरले. आम्ही श्रीलंकेतील अत्यंत सुंदर ठिकाणी फिरायला गेलो होतो.'

मैत्रिणींबद्दल तिने पुढे म्हटलंय, 'गर्ल्स ट्रिप- कितीही छोटी असली तरी सर्वांत चांगली असते. माझ्या मैत्रिणी सर्वांत चांगल्या आहेत. काही या फोटोमध्ये नाहीत, त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत.'

रश्मिका आणि तिच्या मैत्रिणींच्या या ट्रिपचे फोटो पाहून ती लग्नाआधीच्या 'स्पिन्स्टर पार्टी'ला गेल्याचं जाणवतंय. रश्मिका आणि विजय फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करणार आहेत. त्याआधी ती मैत्रिणींसोबत निवांत वेळ घालवताना दिसतेय.