PHOTO : रविना टंडन लवकरच आजी होणार
अभिनेत्री रविना टंडन लवकर आजी होणार आहे. रविनाने नुकतंच मुलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

- अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. रविना टंडनने नुकतंच तिची मोठी मुलगी छायाच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
- छाया ही रविनाची दत्तक घेतलेली मुलगी आहे. रविनाने 1995 मध्ये छाया आणि पूजा या दोन्ही मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्ष तर छायाचे वय 8 वर्ष होते.
- रविनाने नुकतंच मुलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
- त्याचे काही फोटो तिने सोशल मिडीयावर अपलोड केले आहे.
- यातील एका फोटोमध्ये ती आपल्या मुलीसोबत दिसत आहे. विशेष म्हणजे रवीनाने आपल्या ड्रेसवर नानी असे लिहिलेला एक बॅचही लावला आहे.
- आपण आजी होणार असल्याचा आनंद तिच्या प्रत्येक फोटोतून दिसत आहे.
- रवीनाने 2004 मध्ये व्यासायिक अनिल थडानी यांच्याशी लग्न केले.
- त्या दोघांना एक मुलगा आणि मुलगी असून मुलीचे नाव राशा आणि मुलाचे रनबीरवर्धन आहे.








