
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

रवीना टंडन सोमवारी बाबा महाकालेश्वर यांच्या मंदिरात पोहोचली. देवदर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीने शंकराचं दर्शन घेतलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने माध्यमांसोबत संवाद साधला. अभिनेत्री म्हणाली, 'बाबा महाकाल याचं दर्शन घेल्यामुळे प्रसन्न वाटत आहे... ' शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेल्या रवीनाच्या चर्चा सध्या तुफान रंगत आहेत.

रवीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची कायम चर्चा रंगलेली असते.

'केजीएफ २' सिनेमात झळकल्यानंतर रवीना 'केजीएफ ३'मध्ये देखील झळकणार आहे. चाहते कायम अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाच्या चर्चेत असतात.