
मानवी आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लहान असो किंवा वयस्कर प्रत्येकासाठी झोप महत्वाचीच ठरते. पुरेशी झोप मिळाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्याच्या अनेक समस्यांचे आैषध झोप आहे.

युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थनुसार, रात्री झोपण्याचा योग्य वेळ हा 10 ते 11 आहे. यावेळेत झोपल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. लहान मुलांसाठी झोप अत्यंत महत्वाची असते. 5 ते 12 वयोगटातील मुलांना 9 ते 12 तासांच्या झोपेची आवश्यक असते. यासोबतच रात्री 8 ते 9 ही त्यांची झोपण्याची योग्य वेळ आहे.

13 ते 18 वयोगटातील मुलांसाठीही झोप महत्वाची ठरते. बऱ्याचदा अभ्यासाच्या नादात ही मुले रात्रभर जागतात. मात्र, त्यांच्या आयोग्यासाठी हे धोकादायक आहे. रात्री 10. ते 11.30 पर्यंत या वयातील मुलांनी झोपणे आवश्यक आहे.

18 वर्षांच्या पुढील लोकांसाठी 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री 11.30 नंतर ही मंडळी झोपली नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. थकवा अधिक जाणवतो.

वृद्ध लोकांसाठी झोप आवश्यक असते. 65 च्या पुढील लोकांनी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झोपणे आरोग्यासाठी चांगले ठरते. आठ तासांची झोप ही त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरते. सकाळी लवकर उठून चालणे फायदेशीर ठरते.