अंधकार दाटून येईल तेव्हा आंबेडकरांचे हे 8 विचारच दाखवतील प्रकाश…

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर आले असून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. बाबासाहेबांनी या सर्वांना जगण्याची प्रेरणा दिली आहे. म्हणूनच आजही प्रत्येक पिढी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असते.

| Updated on: Dec 06, 2025 | 7:10 AM
1 / 9
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर लाखो लोकांचा अफाट जनसागर उसळला आहे. गावखेड्यातून लोक मुंबईत आले आहेत. आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायीच नव्हे तर प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले आहेत. 1956 पासून चैत्यभूमीवर उसळणारी गर्दी दिवसे न् दिवस वाढतच आहे. बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला ताठ मानेने, अभिमानाने जगायला शिकवलं. त्यांचे विचार आजही जगण्याची प्रेरणा देत असतात. तुमच्या आयुष्यात अंधार दाटून आला असेल तर एकदा बाबासाहेबांचे विचार वाचा. तुम्हाला आपोआपच प्रकाशवाटा सापडतील. जगण्याची प्रेरणा मिळेल. बाबासाहेबांचे हेच विचार आज तुम्हाला सांगणार आहोत.

2 / 9
आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा ते महान असले पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

3 / 9
एखाद्या समाजात महिलांनी किती प्रगती केली, त्यावरून त्या समाजाची प्रगती ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4 / 9
 शील नसेल तर शिक्षणाला काहीच किंमत उरत नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5 / 9
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

6 / 9
शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

7 / 9
मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीयच आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

8 / 9
कोणताही धर्म माणसासाठी असतो माणूस धर्मासाठी नसतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

9 / 9
आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर