
कारल्याचा ज्यूस पिणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर नक्कीच आहे. उपाशीपोटी कारल्याचा ज्यूस पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

विशेष म्हणजे ज्यांना शूगरची समस्या आहे, अशांनी कारल्याचा ज्यूस पिल्याने मोठी मदत होते. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक व्हायला नकोच.

कारल्याचा रस मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करतो. शरीरातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.

कारल्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, झिंक, लोह आणि फोलेट सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. यामुळे त्याचा समावेश करा.

दररोज शक्यतो उपाशी पोटी कारल्याचा ज्यूसचे सेवन करावे. चार ते पाच घोट जरी तुम्ही कारल्याच्या ज्यूसचे सेवन केले तरीही ते फायदेशीर ठरते.