
ऐकून आश्चर्य वाटेल एका सामान्य दोन तोंडाच्या साप रेड सँड बोआ याची किंमत इतकी जास्त का आहे. अखेर या सापाला इतकी किंमत का ? त्याच्याबाबत पसरलेले चुकीच्या समजूतीमुळे काळ्या बाजारात यास हवी तितकी किंमत आहे. या सापांची स्मगलिंग देखील होते. कोट्यवधी रुपये त्यासाठी मिळतात.

बिनविषारी हा सापाला मराठी मांडुळ देखील म्हणतात. याचा युपी-बिहारसह अनेक राज्यात हा सांप सापडतो. दोन तोंडाचा हा साप म्हणूनच त्याला ओळखले जाते. या सापाबाबत अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. त्यामुळे या सापाची अवैध तस्करी केली जाते. अनेकदा या साप विक्री करणाऱ्यांना वनजीव कायद्यानुसार अटक देखील होते.

वनजीव विशेषतज्ज्ञांच्या मते या सापला वैज्ञानिक समुदायात डबल इंजिन साप म्हटले जाते. हे नुकसान करीत नाहीत. दोन तोंडाच्या सापला खरे तर दोन तोंडे नसतात. त्यांच्या शेपटीचा आकार तोंडा सारखा दिसतो, शत्रूंना भ्रमित करण्यासाठी निसर्गाने त्याला असा आकार दिलेला आहे.त्यामुळे शिकारी घाबरतो.

हे साप शांत स्वभावाचे असतात. जर त्यांना त्रास दिला गेला नाही तर त्यांचा मानवाशी कधीही संपर्क येत नाही. दुर्दैवाने यांच्या दुलर्भतेमुळे आणि रहस्यमयी शरीरामुळे यांना अनधिकृत बाजारात खूपच मागणी आहे.

अनेक चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धांमुळे हा साप बाळगणे प्रतिष्ठेचे मानले जाते. म्हणून काळ्या बाजारात या रेड सँड बोआ ( मांडुळ ) मागणी प्रचंड आहे. यातून अलौकीक शक्ती मिळते असा समज असल्याने लोक त्याला २ ते २५ कोटी देखील द्यायला तयार होतात.

अनेक लोकांची धारणा आहे की हा साप लकी आहे. त्यामुळे रेड सँड बोआ बाळगल्याने अपार धन दौलत मिळते असा समज आहे. काही लोकांच्या मते या सांपात कॅन्सर आणि एड्स सारखा आजार बरा करण्याचे गुण आहेत. तज्ज्ञांच्या मते या सापात कोणतेही व्यावसायिक वा औषधी मुल्य नाही. हा केवळ अंधश्रद्धेचा खेळ आहे. काही जण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी याचा बळी देखील देतात. त्यामुळे जादू टोण्यासाठी देखील या सापाचा वापर केला जातो.

औषधात याचा वापर होत असल्याच्या अफवा पसरल्याने देखील द.पूर्व आशियाई बाजारात याची मागणी वाढलेली आहे. परंतू हे सर्व दावे संपूर्णपणे चुकीचे आहेत. रेड सँड बोआ जैविक साखळीतील एक घटक असून तो उंदीर, बेडुक आणि छोटे पक्षी अशांना खाऊन त्याची संख्या नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो.

या रेड सँड बोआची तस्करी करणे,शिकार करणे, पकडणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या सापाला बाळगणे किंवा व्यवसाय करणे यास मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कठोर कायदा असूनही लालसा, अफवा आणि पैशांसाठी याची तस्करी सुरुच आहे