
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत असेल, तर काही संकेतांमधून तुम्ही त्याचा छडा लावू शकता. तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या वागण्यातून काही संकेत मिळत असतील, तर समजून जा, सर्वकाही ठीक चाललेलं नाहीय.

जोडीदार तुमच्यासोबत बोलण्यात जास्त रुची दाखवत नसेल किंवा त्याने बोलणं कमी केलं, तर समजून जा, तो तुम्हाला फसवतोय. पार्टनर त्याचा मोबाइल लपवून वापर करत असेल. तो मोबाइल तुमच्या हाती देत नसेल, तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.

जोडीदार अचानक वेळापत्रकात बदल करु लागला, त्याची कारणही तो सांगत नसेल, तर सावध व्हा. तुमच्यात भावनिक आणि शारीरिक अंतर वाढत चालल असेल, तर हे चांगले संकेत नाहीयत.

तुमच्यात वाढलेल्या अंतरामुळे कुठला तिसरा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. जोडीदार तुमच्याशी सतत खोट बोलतोय असं वाटू लागलं, तर याचा अर्थ काहीतरी चुकतय.

जर, जोडीदार छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावत असेल, विनाकारण भांडत असेल तर हा सुद्धा एक संकेत आहे.