
तिचा लूक, ड्रेस, ब्युटी आणि फॅशन सेन्समुळे ईशा अंबानी कायम चर्चेत असते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची ती मुलगी आहे. रिलायन्स रिटेलची जबाबदारी तिच्या हाती आहे. ती कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे. मेडिकल स्टोअर Netmeds शिवाय अनेक अंडरगारमेंट्सचे ब्रँड पण तिच्याच मालकीचे आहेत.

Amante - ईशाने हा खास भारतीयांसाठी प्रिमियम इनविअर ब्रँड अमांते सुरु केला आहे. मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गासाठी हा खास ब्रँड आहे.

Clovia - रिलायन्सने लोकप्रिय कंपनी क्लोविआमध्ये 950 कोटी रुपयांची हिस्सेदारी मिळवली आहे.

Zivame - ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलने पण जिवामे या ब्रँडचे अधिग्रहण केले आहे. हा भारताचा प्रमुख इनरविअर ब्रँड आहे.

Hush - रिलायन्सचा स्वतःचा ‘हश’ नावाचा इनरविअर ब्रँड आहे. खासकरुन मध्यमवर्गाच्या गरजा लक्षात घेत हा ब्रँड वस्त्र तयार करतो.

Hunkemoller - ईशा अंबानी जागतिक लक्झरिअस ब्रँड ‘हंकमोलर’ ला भारतात घेऊन आली आहे. खास श्रीमंत वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन हा ब्रँड भारतात आणण्यात आला आहे.

BlushLace - दर्जेदार उत्पादन आणि किफायतशीर किंमत या दोन्ही कसोट्यांवर खरं उतरण्यासाठी ईशा अंबानी यांनी ‘ब्लस लेस’ हा खास ब्रँड बाजारात उतरवला आहे.