
'जो एसटी ओर एससी की बात करेगा वही भारत पे राज करेगा' असे फलक लिहीलेले तरुण रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी देखील याचा मोठा फटका जाणवला आहे.

'भारतबंद'मुळे रस्त्यांवर निमदलाच्या तुकड्यांनी संचलन केल्याचे दिसत आहे. रस्त्यावरील वाहने बंद असून सामसुम झालेली दिसत आहे. कॉंग्रेससह अनेक समविचारी पक्षांनी एसटी आणि एससी आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णय म्हणजे संविधान संपविण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे.

- बिहार, झारखंड आणि राजस्थानसारख्या देशातील महत्त्वाच्या राज्यात आंदोलना हिंसक वळण लागले आहे आणि जाळपोळ करण्यात येत आहे, आंदोलकांनी रेल्वे रुळाचा ताबा घेऊन रेल्वे रोको केला आहे.

राजस्थानात पाच जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जयपूर, भरतपूर, गंगापूर सिटी, दौसा आणि डीग या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जयपूरमध्ये दुकाने बंद आहेत. अजमेरमध्ये आरक्षण बचाओ संघर्ष समितीने उग्र निदर्शने केली आहेत.

एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. बिहार, झारखंड आणि राजस्थान सारख्या हिंदी भाषिक पट्ट्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दलित संघटनांनी एससी आणि एसटी जातीत वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात रेल रोको केलेला आहे. जय भिमचे निळे ध्वज हातात घेऊन कार्यकर्ते रुळांवर उतरून त्यांना रेल्वे सेवा बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.