दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महेश घोलप | Updated on: May 05, 2023 | 10:21 AM
1 / 5
दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेतली.

दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेतली.

2 / 5

बैठकीस आमदार सदा सरवणकर, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाच्या मुंबई इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.

3 / 5

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

4 / 5

विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा, या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह विविध पर्याय तपासण्यात यावे.

5 / 5

प्रकल्प रखडविणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us