
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या घरात लौकरच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरलं आहे. नागपूरचे सारंग अरुण लखानी यांच्यासोबत तिचा विवाह निश्चित झाला आहे. मात्र हा विवाह नेमका कधी होणार, याची अधिकृता तारीख वगैरे अद्याप समोर आलेली नाही. शरद पवार यांच्या नातीचं लग्न ठरल्याची बातमी बघता बघता व्हायरल झाली. सध्या पवार-सुळे कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. (Photos - Social Media ? Instagram)

सुप्रिया सुळे यांची जवळची मैत्रीण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लेक स्मृती शिंदे यांनी आज सकाळी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून रेवती आणि सारंग या दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे व त्यांच्या कुटुंबावर सध्या चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुप्रिया व सदानंद सुळे या दोघांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. ती शरद पवार यांची नातवंडं आहेत. लग्न ठरल्याची बातमी समोर आल्यापासून रेवती सुळे हिच्याबद्दल जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे. एरवी लो प्रोफाईल असलेली रेवती नेमकी काय करते, तिचं शिक्षण काय अशा अनेक गोष्टींची माहिती लोकांना जाणूव घेण्याची इच्छा आहे.

शरद पवारांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक असलेल्या रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथून तिने मास्टर्स डिग्री मिळवली आहे. काही वर्षापूर्वी सुप्रिया सुळे यांनीच लेकीच्या यशाबद्दल पोस्ट करत एक सुंदर फोटोही शेअर केला होता.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ही एक जगविख्यात शिक्षणसंस्था आहे. या शिक्षणसंस्थेतून पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे दिग्गज म्हणून नावारूपास आले. जगभरातील अनेक महान व्यक्तींनी येथेच शिक्षण घेतले.

पवार कुटुंब, सुप्रिया सुळे यांच्यासारखी आई, असा मोठा वारसा असूनही रेवती सुळे राजकारणापासून दूर असते, फार प्रसिद्धी झोतात नसते. ती लो प्रोफाईलच असते. मात्र काही काळापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती येथे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी तिने सक्रीय सहभाग नोंदवला होता. तेव्हा ती स्पॉ्टलाइटमध्ये होती.

आता तिचं व सारंग लखानी यांचं लग्न ठरल्याचं जाहीर झाल्यावर रेवती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली असून तिचा भाऊ विजय सुळे यानेही इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत बहिणीचं व भावी जिजाजींचं अभिनंदन केलं.