
अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच 'आशा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा रिंकू मालती या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. चाहते देखील रिंकू हिला आगामी सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सिनेमाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. सिनेमात आशा सेविका म्हणून रिंकू काम करणार आहे.

आता देखील रिंकूने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, 'नमस्कार मी मालती म्हणजेच तुमची आशाताई... १९ डिसेंबर पासुन भेटुयात जवळच्या चित्रपटगृहात' असं लिहिलं आहे.

महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात.

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आगामी सिनेमाची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. आता देखील अभिनेत्रीने आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.