IND vs NZ : ऋषभ पंतने आज हाफ सेंच्युरी झळकवलीच पण एकाचवेळी बनवले दोन वर्ल्ड रेकॉर्ड, गिलख्रिस्ट-धोनी सारख्या दिग्ग्जांना टाकलं मागे
IND vs NZ : ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध वेलिंगटन टेस्ट मॅचच्या तिसऱ्यादिवशी दमदार खेळ दाखवला. त्याने नाबाद अर्धशतक फटकावलं. त्या शिवाय दोन वर्ल्ड रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले.

न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्यादिवशी भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने नाबाद 55 धावा केल्या. या दमदार इनिंगच्या बळावर त्याने वर्ल्ड क्रिकेटमध्ये नवीन इतिहास रचला आहे. एक खास लिस्ट आली आहे, त्यात ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाई दिग्गज एडम गिलख्रिस्ट आणि भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीला मागे टाकलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)
परदेशात खेळल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचेसमध्ये ऋषभ पंत विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. पंतने सर्वात आधी एमएस धोनीला मागे टाकलं. त्याने परदेशी भूमीवर 48 कसोटी सामन्यात 83 इनिंगमध्ये 2496 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)
त्यानंतर पंतने ऑस्ट्रेलियाई दिग्गज गिलख्रिस्टला मागे टाकलं. 2512 धावांचा आकडा पार केला. पंतच्या नावावर आता 36 परदेशी कसोटी सामन्यात 63 इनिंगमध्ये 2544 पेक्षा जास्त धावा आहेत. परदेशात कसोटी सामन्यांमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक शतक मारण्याचा रेकॉर्ड गिलख्रिस्टच्या नावावर आहे. त्याने 10 शतकं झळकवली आहेत. ऋषभ पंत 6 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)
वेलिंगटन टेस्ट मॅचच्या तिसऱ्यादिवशी ऋषभ पंतने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) आपल्या 3000 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. शुबमन गिल नंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. (PHOTO CREDIT- PTI)
पंत WTC इतिहासात 3000 धावा करणारा क्रिकेट विश्वातील पहिला विकेटकीपर फलंदाज आहे. या लिस्टमध्ये पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान आणि ऑस्ट्रेलियााच एलेक्स कॅरी पंतपेक्षा भरपूर मागे आहेत. (PHOTO CREDIT- PTI)