
टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू इरफान पठाणची पत्नी सफा बेगने कधीच आपला चेहरा दाखवला नाही. इरफानने जेवढे फोटो शेअर केलेत त्यामध्ये तिचा चेहरा हा झाकलेला असायचा. मात्र आता खरा चेहरा सर्वांनी पाहिला आहे.

सफा बेगचा कधीच एकही फोटो चेहरा पूर्ण दिसत असलेला फोटो पाहायला मिळणार नाही. मात्र इरफान पठान याने लग्नाच्या वाढदिवशी दोघांचा फोटो टाकला त्यामध्ये तिचा चेहरा पूर्ण दिसला.

पहिल्यांदाच सर्वांनी इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा न झाकलेला फोटो पाहिला. यावर अभिनेता रितेश देशमुख याने फोटोला रिप्लाय देताना, सफा बेग आणि इरफान पठान यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आनंदी, निरोगी राहा, असं रितेश देशमुख याने इरफान पठाण याला शुभेच्छा देताना म्हटलं आहे.

सफा बेग आणि इरफान पठाण यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये निकाह केला होता. त्यानंतर डिसेंबर 2016 ला त्यांना एक लहान मुलगा झाला. त्यानंतर 2021 मध्ये परत एकदा दोघांना आणखी एक मुलगा झाला.