विलिनीकरणाची चर्चा, काँग्रेसमध्ये… पवार गटाची भूमिका काय? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

विलिनिकरणाची चर्चाच नाही तर मी त्यात असण्याचा प्रश्नच नाही. मी माझं काम करतोय. आम्ही भाजपबरोबरही जाणार नाही आणि काँग्रेसमध्य़े विलिन होणार नाही. इंडिया आघाडीबरोबर राहून आम्ही लोकांची भूमिका मांडत राहू, असं शप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
आमची हिम्मत आहे की आम्ही भाजपविरोधात लढू शकतो. जे आज सत्तेत आहेत त्यांची हिम्मत आहे का भाजपला सोडायची. भाजपच्या विरोधात सगळे एकत्र यायचे असेल तर एकत्र येऊ शकतो. आमच्या नेत्यांनी ठरवलं आणि भाजपच्या विरोधात लढायचे असेल तर पुर्वीचा काळ येऊ शकतो.
राहुल गांधी आणि माझ्यात विचारधारा आणि आक्रमकता याच्यात साम्य आहे. पवार साहेबांची जी भूमिका असेल ती माझी भूमिका असेल. पवार साहेब कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत. एकत्र आलो तर मोठी ताकद निर्माण होईल. लोकांच्या मनात सरकारविरोधात खूप मोठा रोष आहे. आम्हाला सरकारला गुडग्यावर आणायला दोन दिवसच लागतील.
त्यामुळं विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं सांगत रोहित पवारांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
इंडिया आघाडीसोबत राहून लोकांची भूमिका मांडत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच भाजपसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.