Russia Attacks Ukraine : जग हादरलं! रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, शेकडो ड्रोन थेट…

रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, आता रशियाच्या या हल्ल्याला युक्रेन प्रत्युत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Sep 20, 2025 | 9:52 PM
1 / 6
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही देशांत तह घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रयत्नांना रशिया जुमानत नाहीये. अशा स्थितीत आता जगाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (20 सप्टेंबर) रशियाने युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. यात क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात तीन युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

3 / 6
रशियाने केलेल्या या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू तर 26 पेक्षा जास्त युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला होताच युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 6
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निप्रॉपेट्रोस, मायकोलाईव, चेर्निहाईव, जापोरिजिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी, खार्किव्ह यासह एकूण 9 ठिकाणांवर रशियाने हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत इमारती, रहिवासी प्रदेश तसेच खासगी मालमत्तांना लक्ष्य करण्यात आलं.

5 / 6
या हल्ल्यानंतर युक्रेनच्या लष्कराने माहिती दिली आहे. या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर एकूण 619 ड्रोनद्वारे  हल्ले केले. यात काही क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. यातील 552 ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आले. तर 2 बॅलेस्टिक आणि 29 क्रुझ मिसाईल्स निष्क्रिय करण्यात आल्या.

6 / 6
दरम्यान, आता रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनही जशास तसे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.