तर हवेतच उडवून टाकू….रशियाची अमेरिकेला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचलं!

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीच ताणलेले आहेत. असे असतानाच आता रशियाने अमेरिकेला थेट धमकीची दिली आहे. या धमकीमुळे आता जगात खळबळ उडाली आहे.

| Updated on: Oct 08, 2025 | 9:44 PM
1 / 5
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेले नाही. एकीकडे शस्त्रसंधीसाठी चर्चा चालू असताना दुसरीकडे हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करताना दिसत आहेत.

2 / 5
या दोन्ही देशांतील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यात अद्याप यश आलेले नाही. रशियाकडून वेळोवेळी अमेरिका आणि युक्रेन अशा दोन्ही देशांना इशारे दिले जात आहेत.

3 / 5
युक्रेन युद्ध थांबत नसल्यामुळे आता रशिया आणि अमेरिका यांच्यातही तणावाची स्थिती आहे. अमेरिका रशियावर वेगवेगळे निर्बंध लादत आहे. असे असतानाच आता रशियाच्या एका वरिष्ठ खासदाराने अमेरिकेला थेट धमकीच दिली आहे.

4 / 5
रशियन संसदेच्या संरक्षण समितीचे प्रमुख आद्रेई कार्तपोलोव यांनी ही धमकी दिली आहे. अमेरिका युक्रेनला टॉमहॉक क्रूझ मिसाईल्स देत असेल आणि या मिसाईल्सचा युक्रेनकडून वापर करण्यात आला तर आम्ही ही क्षेपणास्त्रे हवेतच नेस्तनाबूत करून टाकू तसेच युक्रेनच्या लॉन्च पॅडवरही आम्ही हल्ला करू असे आंद्रेई यांनी म्हटले आहे.

5 / 5
अमेरिकेच्या या क्षेपणास्त्रांबाबत आम्हाला चांगल्या प्रकारची माहिती आहे. सिरियाच्या युद्धात आम्हाला या मिसाईल्सचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे अशी क्षेपणास्त्रे देणाऱ्या आणि क्षेपणास्त्रांचा वापर करणाऱ्या देशांपुढेच खरी अडचण निर्माण होणार आहे, असेही कार्तपोलोव  यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिका यावर कोणती प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.