Putin India Visit : पुतिन भारताला एअर डिफेन्सचा बाप S-500 सिस्टिम देणार का? S-400 आणि S-500 मध्ये फरक काय? पाकिस्तानचे अजून धाबे दणाणतील

Putin India Visit : आजच्या तारखेला S-500 ही सर्व एअर डिफेन्स सिस्टिमची बाप आहे. भारताकडे असलेल्या S-400 ची घातकता पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अनुभवलीच. पण उद्या S-500 खरेदीचा करार झाला, तर पाकिस्तानची पायाखालची जमीन सरकेल. या S-500 सिस्टिममध्ये असं काय खास आहे? जाणून घ्या.

Updated on: Dec 03, 2025 | 5:13 PM
1 / 5
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सर्वच शस्त्र यशस्वी ठरली. पण एका अस्त्राने सर्वात अद्वितीय कामगिरी केली ते म्हणजे S-400. रशियन बनावटीच्या या  S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या पाच रेजिमेंटची भारताने 2018 मध्ये ऑर्डर दिली होती. एकूण 5.43 अब्ज डॉलर्सचा हा सर्व व्यवहार आहे.

2 / 5
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी डागलेली ड्रोन्स, क्षेपणास्त्र  S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली. S-400 ने येणार्‍या रॉकेट्स, फायटर जेट्सचा अचूक माग काढला. पाकिस्तानच्या आतमध्ये खोलवर घुसून पाकिस्तानी जेट्स पाडली. हे शक्य झालं ते फक्त  S-400 च्या रेंजमुळे.

3 / 5
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. संरक्षण करारांच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे. पुतिन यांच्या भारत भेटीत भारत आणखी  S-400 सिस्टिम विकत घेणार की, त्यापुढचं व्हर्जन S-500 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदीचा करार होणार हा प्रश्न आहे.

4 / 5
S-400 ची रेंज 400 किलोमीटर पर्यंतची आहे. म्हणजे 400 किलोमीटर अंतरावरील कोणताही हवाई धोका या सिस्टिमद्वारे हवेतच नष्ट करता येतो. तेच  S-500 ची रेंज 500 ते 600 किलोमीटर आहे. S-400 सिस्टिम 30 किलोमीटर उंचीपर्यंतच टार्गेट हेरुन नष्ट करते. S-500 सिस्टिम 180 ते 200 उंचीपर्यंत हवाई टार्गेट नष्ट करु शकते. ही उंची म्हणजे अवकाशाच्या जवळपासचा थर झाला.

5 / 5
फायटर जेट्स, अन्य विमानं, ड्रोन्स आणि क्रूझ मिसाइल्स S-400 सिस्टिमद्वारे नष्ट करता येतात.  S-500 सिस्टिम त्यापुढे जाऊन लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल्स आणि हायपरसोनिक मिसाइल्सही नष्ट करु शकते. सध्या हायपरसोनिक मिसाइल रोखणारी जगातील एकमेव सिस्टिम म्हणजे S-500 आहे. चीन आणि पाकिस्तान सारखे देश हे तंत्रज्ञान मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे S-500 भविष्यासाठी तरतूद ठरेल.