
अभिनेते सचिन पिळगावकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेवरील प्रेमाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सचिन पिळगावकर यांनी 'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेवरील प्रेम व्यक्त केले होते. मात्र, नेटकऱ्यांना ते पटले नाही आणि त्यांनी महागुरुंवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली.

'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, "माझी मातृभाषा ही मराठी आहे. पण मी विचार हे उर्दू भाषेमध्येच करतो. रात्री 3 वाजता माझी बायको किंवा इतर कोणी मला उठवतं तरी मी उर्दू बोलत उठतो. एवढंच नाही मी उर्दू बोलत झोपतोही."

सचिन पिळगावकर यांचे हे वक्तव्य ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने, “मराठी भाषेनं तुम्हाला मोठं केलं, प्रसिद्धी आणि पैसा दिला, पण तुम्ही मराठी संस्कृतीऐवजी उर्दू भाषेचा गौरव करत आहात” असे म्हटले.

दुसऱ्या एका यूजरने सचिन पिळगावकर यांना छोले चित्रपटाची आठवण करुन दिली आहे. “म्हणूनच त्यांना शोले चित्रपटात गब्बरने घोड्यावर उलटा टाकून पाठवला होता.”

तिसऱ्या एका यूजरने सचिन पिळगावकर यांना सल्ला दिला आहे. त्याने थेट “सचिन यांनी मराठीऐवजी उर्दू सिनेमांमध्येच काम करायला हवं होतं” असे म्हटले आहे.