Sacred Games मधील मराठमोळ्या अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, शस्त्रक्रिया होताच सांगितली आपबिती

एका मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

| Updated on: Mar 29, 2026 | 10:23 AM
1 / 6
जीवन किती अनिश्चित आहे, हे आपण नेहमीच म्हणतो. आपल्यासोबत कधी काय घडेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. अलिकडेच वेबसीरीज ‘Sacred Games’मधून चर्चेत आलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात असेच काहीसे घडले आहे. या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.

जीवन किती अनिश्चित आहे, हे आपण नेहमीच म्हणतो. आपल्यासोबत कधी काय घडेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. अलिकडेच वेबसीरीज ‘Sacred Games’मधून चर्चेत आलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात असेच काहीसे घडले आहे. या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.

2 / 6

Sacred Games मधील मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजश्रीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. त्यात तिने रुग्णालयातील फोटोही पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने आपली आपबिती सांगितली आहे.

3 / 6

राजश्री देशपांडेने तिच्या पोस्टमध्ये, “जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे कळले, त्या दिवशी मी रुग्णालयाच्या रिपोर्ट सेंटरबाहेर एकटीच उभी होते. रिपोर्ट वाचून मी पूर्णपणे खचून गेले. स्वतःला सावरूच शकले नाही,” असे लिहिले.

4 / 6

तिने पुढे म्हटले, “मला आजार झाल्याचे कळताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत विचारले, ‘तू इतकी फिट आहेस, मग तुला हा आजार कसा झाला?’ पण खरं सांगू, माझ्याकडे याचे उत्तर नाही. हा आजार केवळ शारीरिक नव्हता, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही अत्यंत कष्टदायक होता. मी अनेकदा रडले, कारण वेदना असह्य होत्या.”

5 / 6

राजश्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, या कठीण काळात तिला मित्र-मैत्रिणींची विशेष साथ लाभली. “कधी कधी मी स्वतःला सांगते की मी हार मानणार नाही, पण काही दिवस असे येतात जेव्हा काहीच नकोसे वाटते. फक्त शांत राहावेसे वाटते. किंवा मेरी ऑलिव्हरच्या कवितेप्रमाणे खिडकीजवळ बसून चिमणींसोबत सूर्योदय पाहावा असे वाटते. सकाळी आनंदाने उठणे हेही आजकाल मोठे यश वाटते,” असे तिने भावुक होऊन लिहिले.

6 / 6

“आज मी स्वतःसाठी हसले आणि स्वतःला मिठी मारली,” असे म्हणत राजश्रीने या प्रवासात तिच्या विचारपूस करणाऱ्या, फोन आणि मेसेज करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. शेवटी तिने लिहिले, “मला माहीत नाही, पण पुन्हा एकदा नव्याने संघर्ष करण्यासाठी तयार राहावे लागेल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us