Saif Ali Khan: 800 कोटींचा पतौडी पॅलेस, 150 खोल्या, सैफच्या रॉयल जीवनशैलीची झलक, Inside फोटो समोर
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडता नवाब आहे, त्याची लाईफस्टाईल कोणत्या राजापेक्षा कमी नाही. वडील मंसूर अली खान पतौडी यांच्याकडून मिळालेला वारसा सैफ पुढे वाढवत आहे. त्यांचं आलिशान पतौडी पॅलेस आहे. रिपोर्टनुसार, 2005 मध्ये ही प्रॉपर्टी नीमराना हॉटेल्स ग्रूपला लीजवर दिलेली. मात्र, वडील नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर, सैफने 800 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजून ती पुन्हा मिळवली.

सैफ अली खान याने सोशल मीडियावर त्याच्या आलिशान पॅलेसची एक झलक दाखवली आहे. या पॅलेसमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त खोल्या आहेत, ज्यामध्ये 7 बेडरुन, 7 ड्रेसिंग रुम, 7 बिलियर्ड आणि फार मोठा डायनिंग आणि ड्रॉइंग रुम आहेत.
सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसला आर्किटेक्ट रॉबर्ट टोर रसेल यांनी नवा लूक दिला आहे. त्यांनी यामध्ये जिओमेट्रिक पॅटर्नचा वापर केलाय, जे युरोपियन निओक्लासिकल शैलीची आठवण करून देतात.
फुलांची डिझाईन्स भारतीय वारसा दर्शवतात, तर शाही घराण्याच्या फोटो याच्या इंटिरियरला एक वैयक्तिक स्पर्श देतात. येथील मोठ्या कॉरिडोअरमध्ये काळ्या आणि पांढऱ्या संगमरवरी फरशीची चेकर-बोर्ड डिझाईन आहे.
तसेच भिंतींवर पिवळ्या, पांढऱ्या, क्रीम आणि पेस्टल रंगांच्या फिकट छटा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, येथे एक विंटेज लायब्ररी देखील आहे, ज्याची झलक अलीकडेच सैफच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पाहायला मिळाली होती.
सैफ अली खानच्या पॅलेसच्या डायनिंग एरियामध्ये क्रिस्टलचे झुंबर, दिवे, फुलदाण्या आणि मंद व उबदार प्रकाश याने हा परिसर उजळून निघतो. सोबतच, प्रत्येक कोपऱ्यात ठेवलेली रोपं याचं सौंदर्य आणखी वाढवतात.
शिवाय बेडरूममध्ये लाकडी फ्लोअरिंग, दुर्मिळ/प्राचीन वस्तू आणि हाताने बनवलेले फर्निचर उपलब्ध आहे. याशिवाय, येथे उंच छत असलेले व्हरांडे, लाकडी फ्लोअरिंग आणि गुलाबी व्हेनेशियन झुंबर देखील आहेत.