
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदीप ही सगळी पात्रं त्यांच्या अनोख्या स्टाईल आणि लूकमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

याच चित्रपटातील प्रदीप बनसोडे म्हणजेच अभिनेता तानाजी जलगुंडे याचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो लवकरच अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत झळकणार आहे. ही जोडी '13 लीला विला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन सिराज अरब यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकतंच या चित्रपटातील मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुंडेचा लूक समोर आला आहे.

या फोटोमध्ये तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट, डोळ्यांवर काळा चष्मा आणि वेगळीच हेअर स्टाईल, गळ्यात सोन्याची मोठी चैन, हातात घड्याळ.. जणू काय गावातला पाटीलच दिसतोय.

त्याच्यासोबत अभिनेत्री मोनालिसा बागल एका सोज्वळ सुंदर आणि दाक्षिणात्य लूकमध्ये झळकतेय. तानाजी गलगुंडे आणि मोनालिसा बागल ही नवी कोरी जोडी पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.